धनेश्वर गोशाळा
धनेश्वर गोशाळा
संस्थेविषयी थोडक्यात माहिती
धनेश्वर गोशाळा ट्रस्ट हि संस्था चिंचवड गाव येथील श्री धनेश्वर प्राचीन शिवालय येथे असून धनेश्वर सेवेकरी यांच्या सेवेतून दि . रोजी रजिस्टर करून या ट्रस्ट ची स्थापना झाली. या गोशाळे मार्फत दरवर्षी बैलपोळा, गो पूजन, या सारखे उपक्रम राबवले जातात. सध्या गोशाळेत ४० गीर गाय व ३ बैल असून मुक्त गोशाळा व प्रशस्त असा गोठा आहे. गाई पासून निघणारे दूध हे गर्भवती स्री व लहान बालके यांच्या साठी देण्यात येते. हिंदू धर्मात गाई च्या गोमूत्र व शेण याना पवित्र स्थान आहे. तसेच शांती होम हवन याना देखील गाई च्या शेणापासून बनवलेल्या गौराई वापरल्या जातात. गोशाळे मार्फत शेणाची गौराई व गोमूत्र भाविकांना उपलब्ध करून देण्यात येते. धनेश्वर सेवेकरी यांच्या मार्फत गाई चा गोठा हा रोज साफ केला जातो व गाई ची योग्य ती काळजी घेतली जाते.